Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com
 
 
 

काळाच्या ओघात खूप वाहत आपण... कधी स्वतःच्या मर्जीने तर कधी दुसऱ्या दुसऱ्यांच्या... जेव्हा स्वतःचं डोकं, बुद्धी चालेनाशी होते, तेव्हा वाहवत जाणं फार सोपं वाटायला लागतं ... ज्याच्या त्याच्या विचारशक्तीप्रमाणे जो-तो पुढे जात राहतो. यात मुख्य असतात ते क्षण... जे आपल्याला खरोकर जगायला शिकवतात... ते क्षण...

I.P.H... Institute of psychological Health... गेल्या २०-२१ वर्षापासून या संस्थेचा चालू असलेला एक अप्रतिम उपक्रम म्हणजे 'वेध'च्या सुदैवाने गेल्या तीन वर्षापासून माझ्याच शाळेच्या पटांगणात मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. 

खरं जगणं म्हजे काय?... नुसतंच जिवंत राहणं अन् खरोखर समरसून जगणं याकडे मी डोळसपणे पाहायला शिकले ते यावर्षी 'वेध' मध्ये ! मुळात या वेळची themeच फार interesting आहे... कधी-कधी लोकसत्तामधल्या, चतुरंग, लोकरंग मधील articles वाचता - वाचता एकदम click होत - ' अरे ! हे जे इथे मांडलंय ते खरं जगणं आहे !' उरलेले आयुष्य तर फक्त लादलेलं ओझं ! 

कशाच्या तरी मागे आपण नेहमी पळत असतो... ती गोष्ट मिळाली कि, मी satisfy होईन, असं वाटत राहतं... सर्वसामान्य माणसाच्या मनातले हे विचार... पण या अन् अशाच अनेक अर्धवट विचारांना 'वेध' मध्ये आलेल्या त्या व्यक्तींची एक-दोन कळीची वाक्य मोडीत काढतात. खऱ्या जगण्याचा, कर्तृत्वातून घडलेल्या त्या व्यक्तीच्या जीवनाचा 'वेध' घेतला जातो, तो इथे. 

आपल्यासारख्याच सर्वसामान्य व्यक्ती... आपल्यासारखी साधी कुटूंब... पण आपल्यापेक्षा त्यांच्यात काहीतरी वेगळेपण असतं... जे आम्हा साऱ्यांसाठी inspirtional असतं. रोजच्या जगण्यात जगायला शिकवणारं असतं. ज्यांना 'वेध' च्या व्यासपीठावर बोलावलं जातं ते सारे काही आपल्याला स्वप्नांच्या मागे आंधळेपणाने पळायला शिकवीत नाही... तर आपली स्वप्नं पूर्ण करीत असताना डोळसपणे 'जगायला' शिकवतात......

 

- तन्वी जोशी इयत्ता - ११ वी 

 
 
 

वेध कडे आम्ही वणी ज्ञानपीठचे व्यासपीठ म्हणून पाहतो. यंदाच्या उत्कंठेचे कारणही कदाचित यंदाच्या 'वेध' चे सूत्र - 'जगण्याचा ताल व तोल' होते. अलीकडे एका ट्रेनिगच्या कार्यक्रमात GDP (Gross Domestic Product) या शब्दाचा नवीन अर्थ Grossly Drepressed People असा ऐकल्यानंतर मनात थोडीशी काळजी लागून राहिली होती आणि त्यामुळे सामन्यातील असामान्य माणसे आजच्या जीवनातील सगळी आव्हाने पेलून स्वतःच्या जीवनातील ताल व तोल सांभाळून आयुष्य सार्थक कसे जगतात, याकडे 'वेध' मुले वेध लागले होते.

या वर्षी 'वेध' च्या गीताने मनाची खूप शांती झाली. आनंदाने जगण्याचा मंत्र अतिशय सहजपणे नेमक्या व ठोस शब्दांत मांडला होता. श्री. दाभोळकरांच्या बीजभाषाने 'वेध' च्या 'सूत्राची' व पुढील 'सत्रांची ' पकड आमच्या मनात घट्ट बसली. विज्ञान व धर्म यातील समन्वेय हा ताल व तोल आहे. आपले गुरुत्वमय शोधणे हा ताल व तोल यांचा समन्वेय आहे. व्यक्ती व समष्टी या दोन पातळ्यांवर असलेल्या या दोहोंचा समन्वेय आपण साधण्याचं प्रयत्न निश्चित केला पाहिजे, त्यांनी सहज कथन केलेली ; परंतु मला भावलेली या सत्रातील गोष्ट म्हणजे श्रद्धा हि प्रयत्नांवर असली पाहिजे व तोच धर्म आहे.....
 

  - सौ. गीता शहा, विद्यादान सहाय्यक मंडळ, ठाणे

 

BACK PAGE  |

NEXT PAGE  |

 


 


       

       
 

Home  |  About Vedh  |  Vedh Centers  |   Faculties  |  Vedh In Your City  |  Future Vedh  |  Testimonials  |  DVD  |  Media Download  |

 

This is a flagship event of IPH running successfully for more than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its its 26th edition in December 2018 . IPH with respective partners now organizes VEDH at Ahmednagar (10yrs), Aurangabad (10yrs) , Nashik (7 yrs), Pune (7 yrs), Latur (7 yrs), kalyan (4 yrs), Pen (3 yrs) and Parbhani (3 yrs).........

 
 

+ More

About Vedh   Vedh Centres  


Vedh Faculties   Vedh In Your City  


Future Vedh   Testimonials  


DVD   Download PDF  

9th Floor, Shree Ganesh Darshan, LBS Marg, Naupada, Thane (west) - 400602,
Maharashtra, INDIA

Tel:
+91 22 2543 3270 / 2536 6577 / 2542 8183

Email :
info@vedhiph.com 

  © Copyright 2016 Vedhiph. All Rights Reserved.  

Designed & Develped By Marathe Infotech Pvt. Ltd.