|
|
|
|
|
|
स्टेज समोरून व स्टेज
वरून |
मी दहावीत होतो, ते साल १९९३. आम्ही सगळे मित्र - मैत्रीणी
मिळून बेडेकर शाळेत पोहचलो, ते 'वेध' परिषदेसाठी. शाळेच्या
वेगवेगळ्या वर्ग खोल्यांमध्ये विविध विषयांतील तज्ज्ञांची सत्रे
सुरु होती आणि तळमजल्यावर एक खुले सत्रही होते. ते माध्यमांशी
निगडित होते. आम्ही सगळेकडे थोडा-थोडा वेळ थांबलो आणि त्या
खुल्या सत्रात सहभागी झालो. सगळेकडून माहिती कानावर पडत होती.
प्रश्न विचारले जात होते आणि उत्तरेही येत होती. खुल्या सत्राचे
संचालक डॉ. आनंद नाडकर्णी करत होते आम्हा सगळ्यांवर त्यांनी
चांगलीच छाप पाडली होती. 'वेध' परिषद संपली तरी... असे आम्ही
मनाशी पक्के केले होते.
पुढले वर्ष तर भन्नाट निघाले. अकरावीत मो. ह. विद्यालयात
जुनिअर कॉलेजात प्रवेश घेतला होता. त्या वर्षाची परिषद मो. ह.
मध्येच होणार होती. 'वेध' च्या आयोजनात मदत करणाऱ्या आमच्या
शाळेतील अविनाश बर्वेसरांनी एके दिवशी सकाळीच मला बोलावून
घेतलेणी 'वेध' परिषदेच्या १९९४ वर्षाचे पहिले तिकीट घेण्यास
सांगितले. त्या वर्षी डॉ. नाडकर्णी यांनी उद्घाटनाचा वेगळाच
बेत आखला होता. ज्याचे पहिले तिकीट काढले, त्याला उद्घाटन
करण्याचा मान मिळणार होता. तो अर्थातच मला मिळाला. उद्घाटन
करायचे म्हणजे काय करायचे ? मला समजावून सांगण्यात आले. एका
फळ्यावर वेगवेगळ्या रंगाचे फुगे लावलेहोते आणि त्या खाली एक
विषय लिहला होता. मी छऱ्याच्या बंदुकीने त्यातील कोणताही एक
फुगा फोडायचा कि झाले उद्घाटन ! एनसीसीच्या मित्रांनी माझा
बंदूक चालवण्याचा सराव करून घेतला माझ्याकडून नेम लागला नाही,
तर कोणी बंदूक चालवायची हेही ठरले होते. प्रेत्यक्षात,
कर्म-धर्मसंयोगानेच, माझा नेम बरोबर लागले आणि उद्योग असे
लिहलेला फुगा फुटला. योगायोग म्हणजे त्या वर्षी जेष्ठ उदयोजक
कॅमलिनचे सुभाष दांडेकर अध्यष होते. तो नेम लागला खरा आणि त्या
दिवसापासून 'वेध' शी माझे नटे जुळले. त्या दोन दिवसात मी पूर्ण
हवेत होतो. समारोपाच्या दिवशी डॉक्टरांना म्हणालो, 'वेध' साठी
स्वयंकसेवक म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे. डॉक्टर
नेहमीप्रमाणे हसले. त्याच वर्षी, इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल
हेल्थतर्फे कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी 'अविष्कार' हि
व्यक्तिमत्व स्पर्धा घेण्यात अली होती. मी त्यात भाग घेतला आणि
आयपीएच परिवाराशी जोडला गेलो.
पुढल्या वर्षी मो. ह. विद्यालयाच्या पटांगणात परिषदेचे आयोजन
करण्यात आले. आता पसारा वाढला होता. मोठे स्टेज, त्याच्या समोर
आसनव्यवस्था, मंडप सगळेच, आधीच्या सगळ्या 'वेध' पेक्षा खूप
निराळे. त्या वर्षी माध्यमांच्या सत्रात आमिर खान येणार होता.
त्यामुळे रविवारच्या सत्राला तर तुडूंब गर्दी. मी डॉक्टरांना
संचालनाच्या कामात मदत करू लागलो होतो. उद्घाटनाचा कार्येक्रम
झाला आणि त्यानंतरचे सत्र सुरु होण्यास विलंब होत होता. मी
स्टेजवर होतो. कंट्रोल रूममधून निरोपाची वाटच पाहत होतो. तो
काही केल्या येत नव्हता. ..............
|
|
|
|
Home |
About Vedh |
Vedh Centers |
Faculties |
Vedh In Your City |
Future Vedh |
Testimonials |
DVD
| Media |
Download | |
|
|
|
This is a
flagship event of IPH running successfully for more
than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH
started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its its 26th edition in December 2018 . IPH with respective partners now organizes
VEDH at Ahmednagar (10yrs), Aurangabad (10yrs) , Nashik (7 yrs), Pune (7 yrs), Latur (7 yrs), kalyan (4 yrs), Pen (3 yrs) and Parbhani (3 yrs)......... |
|
|
+ More |
|
|
|
9th Floor, Shree Ganesh Darshan,
LBS Marg, Naupada, Thane (west) - 400602,
Maharashtra, INDIA
Tel:
+91 22 2543 3270 / 2536 6577 / 2542 8183
Email : info@vedhiph.com |
|
|
|
|
|