|
इडियट्सकी पाठशाळा
- डॉ. आनंद नाडकर्णी |
२० जानेवारी २०१३ आत्ताच दोन तासांपूर्वी लातूर शहरामध्ये, वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेचे दुसरे आवर्तन संपन्न झाले. ठाण्यामध्ये बावीस वर्षांपूर्वी सुरु झालेला हा वार्षिक उपक्रम, विद्यार्थी-पालक, शिक्षक ह्यांना भविष्याची दिशा दाखवणारा, विविध क्षेत्रातल्या 'रोल मॉडेल्स' बरोबर मुक्त संवादाची संधी देणारा. ठाण्याबरोबरच आता महाराष्ट्रातल्या सहा शहरांमध्ये पसरलेला लातूर मधले हे दुसरे वर्ष. परिषदेचे विचारसूत्र होते, 'कर्तृत्वाचे मोजमाप' दोन दिवस आधीच सर्व प्रेवेशिका संपलेल्या. ;वेध' चे कार्यकर्ते मला सांगत होते कि पुढच्या वर्षी मांडावंच घालावा लागणार एवढा प्रतिसाद आहे. लातूर शहरातल्या शाळांबरोबरच भोवतालच्या ग्रामीण शाळांमधले विद्यार्थी-शिक्षकहि मोठया संख्येने हजार होते आणि कुणाला ऐकायला ? जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. रूपा रेगे-नित्सुरे, साहसी खेळांचा प्रसार करणारे प्रसाद पुरंदरे, कोर्टातील वकिलाला सामाजिक चवळीची जोड देणारे असीम सरोदे, मराठवाडयातून सिनेसृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून जम बसवलेले नरेंद्र राहुरीकर आणि तरुण अभिनेत्री स्पृहा जोशी... हि पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल कि स्पृहाचा अपवाद सोडला तर ग्लॅमरचे वलय कुणाही भोवती नाही. तरीही प्रचंड प्रतिसाद.
ह्या पाच मुलाखतीमधून विद्यर्थ्यासमोर, पालकांसमोर आलेली सूत्रे कशी होती?... कर्तृत्वाचे मोजमाप करण्यासाठी लावायच्या पैसा, प्रसिद्धी ह्या फूटपट्ट्या अगदीच अल्पायुषी आहेत. आपल्या आंतरिक समाधान देते ते कर्तृत्व, मुक्कामापेक्षा प्रवासाला महत्व दिल्याने जगणे अधिक रसरशीत बनते. मग त्यासाठी कोणत्याही स्पर्धेत उतरणे अटळ बनत नाही. प्रसाद पुरंदरे म्हणाले तसे 'शिक्षणाचा ध्रुवतारा' म्हणजे शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर !... ज्यांच्या विचारांचा प्रभाव अनेक वर्षे टिकतो ती खरी कर्तृत्ववान माणसे. ज्याच्या विषयी अनेक जणांच्या मनात कृतज्ञता असते तो माणूस कर्तृत्ववान. आपले कर्तृत्व जगापुढे न मिरवता जी व्यक्ती सर्वांमध्ये विरघळते ती ग्रेट... स्वतःच्या संकुचित स्वार्थाला व्यापक केल्याशिवाय माणूस कर्तृत्ववान ठरत नाही... अगदी रसरशीतपणे, स्वभावातून पाचही जणांनी हे सारे ठासून मांडलेच. गंमत म्हणजे जमलेल्या विद्यार्थ्यापैकी अक्षरशः शेकडो जणांनी त्यांच्या लेखी प्रतिक्रियांमध्ये ह्याच विचारांचा प्रतिध्वनी दिला... कार्यक्रम संपल्यावर एकजण म्हणाले, "अहो, लातूर पॅटर्न' च्या संपूर्ण विरोधातली मांडणी हा तुमचा वेध करतोय... आणि त्याला शेकडो-हजारोंचा प्रतिसाद मिळतोय... काही खरं नाही ! मी म्हणालो, "कुणाचं खरं नाही ?... "
"अहो असे विचार खरेच रुजले, फोफावले तर ' लातूर पॅटर्न' वर ज्यांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय त्यांच खरं नाही..." ते म्हणाले. "असा दिवस कधी येईल कि नाही ह्याबद्दल मला काहीच शाश्वती नाही... पण खऱ्या विकासाची दिशा दाखवणारी व्यासपीठे टिकत नाहीत, लोकप्रिय होत नाहीत हा समज काहीसा दुबळा करता आला तरी तेही काम महत्वाचे आहे..." मी म्हणालो. आपला हेतू शुद्ध असेल, भविष्यातल्या समाजाबद्धलची कळकळ असेल तर योग्य संघटन, नियोजन ह्याचा उपयोग करून विधायक उपक्रम करता येतील... एका ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी आणि संवेदना बोथट झाल्या आहेत, आत्मकेंद्रित झाले आहे असे आरोप आपण ज्यांच्यावर करतो ती तरुण पिढी आपल्यला चक्क प्रतिसाद देते.
२०१२ साल हे नगर चे सातवे वर्ष. विचारसूत्र होते. 'पायाकडून कळसाकडे' ह्या सूत्राच्या भोवती मी शीर्षकगीत रचले होते..............
|
|
|
|
|
|
|
|
|