२५ सप्टेबर २०११, रविवार .....
... यशवंतराव चव्हाण नाटयगृह, कोथरूड, पुणे
... सकाळचे दहा वाजले, नाटयगृहाचा पडदा वर गेला आणि
मी स्टेजवरून लोकांना अभिवादन करत होतो....
सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम, !
पुण्यातील पहिल्या वेध परिषदेत आपले स्वागत. पुढील
काही तास आपण एका विचारसूत्राने बांधले जाणार आहोत
आणि ते सूत्र आहे -
'सृजनशीलता आणि सर्जनशीलता'
आज गेल्या तीन वर्षांचा लेखाजोखा मांडतांना माझ्या
डोळ्यासमोरून पहिल्या वेधचे दृष्य हलतच नाही. या
सर्वाची सुरुवात फारच अनोखी होती. एप्रिल २०११,
वेध म्हणजे काय ? याची पुसट कल्पनाही नव्हती. माझी
बहीण डॉ. कल्पना जोशी हीच मला फोन-
"दादा, डॉ. आनंद नाडकर्णी वेध प्रशिक्षण शिबीर
घेणार आहेत. तू ये."
मी माझ्या सहकारी मंजुषा बारहाते आणि विदुला लिमये
यांच्या समवेत ठाण्यात आय.पी.एच. मध्ये वेध
कार्यशाळेसाठी दाखल झालो. दोन दिवसांच्या
शिबिराच्या समारोपात तेथे आलेल्या सर्वांना
सप्टेंबर मध्य पुण्यात पहिल्या वेध परिषदेला
येण्याचे निमंत्रण देऊन टाकले. या परिषदेचे
विचारसूत्र सृजनशीलता आणि सर्जनशीलता हे हि तिथेच
निश्चित केले आणि सुरु झाला वेध प्रवास -
असा प्रवास कि जो सुरूच राहणार आहे. अखंड सतत -
सुरु झाले, वेधचे इव्हेन्टमॅनेजमेंट .....
फॅकल्टी ठरविणे, नाट्यगृह मिळविणे, प्रवेशिका छापणे,
नामंत्रितांना आमंत्रण असे पुष्कळ काही, अनुभव
विश्व समृद्ध करणारे. त्या दिवसाने काय दिले -
एक नवीन दृष्टी. एक नवीन उर्मी . एक नवीन ऊर्जा !
हे सर्व काही विलक्षण आहे. अनुभवल्याशिवाय शिवाय न
कळणारे आणि आकलन झाल्यावर त्यात झोकून देणारे क्षण.
केवळ अदभूत अविश्वसनीय, अविस्मरणीय !
|