|
 |
|
|
|
|
१०
डिसेंबर २०११.. वेळ सकाळचे नऊ. नाशिकमधील
दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या भव्य व्यासपीठावरील
उजळू लागले आणि समोर बसलेल्या दोन-अडीच हजार मुलं
- पालकांचे डोळे आश्चर्याने औत्सुक्याने लकाकू
लागले. हे आस्चर्य होते समोर, व्यासपीठावर
दिसणाऱ्या दिसणाऱ्या निळ्या-पांढऱ्या ढगांचे. अगदी
आकाशातील ढग खाली यावे इतके ते ढग अस्सल वाटत होते.
आणि उत्सुकता वाढत होती. त्या 'ढगांवर स्वार' होऊन
बसणाऱ्या पाहूण्यांबद्दलची श्री. दीपक घैसास, वीणा
पाटील, संग्रामसिंग निशाणदार, श्री. अंशू गुप्ता
आणि सुचेता कडेठाणकर. काही ओळखींचे काही थोडे
अनोळखी. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रातील, मुठीत
पकडून नेता येईल नेमके ? विद्यार्थ्यांच्या मनात
खूप सारे प्रश्न होते आणि वेगळे काही ऐकायला मिळेल
असे आश्वासनही ....
नाशिकमध्ये 'वेध' सुरु होऊन दोन वर्षे झाली. यंदा
७ डिसेंबरला तिसरी वेध परिषद होईल आणि पहिली दोन्ही
वर्ष जी उत्सुकता आणि आनंद 'वेध'ला येणाऱ्या
विद्यार्थी - पालकांच्या मनात होता तीच भावना
आमच्या टीमच्या मनातही होती. पण त्याबरोबरीने होतो
थोडी धाकधूक आणि बरीच चिंता. दिवसभरातील पाच सत्र,
पाच ठिकाणाहून येणारे पाच पाहुणे, अडीच हजार तिकिटे
विकण्याचे आव्हान आणि एवढया धडपडीनंतर श्रोत्यांना
सत्र आवडतील कि नाही अशी सतत मन कुर्तडणारी शंका.
पण ती संध्याकाळ मावळताना आम्हा सर्वांना मनात होते
अतीव समाधान आणि मस्त आनंद. कारण पाचही पाहुण्यांनी
मुलांना भरभरून दिलं होतं. आणि ती भरलेली ओंजळ
बघून मुलांचे पालक, शिक्षक खूप भारावून गेले होते.....
ठाण्यातील 'वेध' आणि तिची जादू याविषयी खरे तर
अनेक वर्षांपासून ऐकायला-वाचायला मिळत होते. जयंत
नारळीकरांपासून गंगूबाई हनलांसारख्या बुजुर्ग
गायिकेपर्यंत तिथे येणारे तऱ्हेतऱ्हेचे पाहुणे,
तिकीट विक्री सुरु होताच लागणारी 'बुकिंग बंद 'ची
पाटी, काही वर्ष 'वेध'च्या आगे मागे रंगलेले संगीत
महोत्सव हे सगळं वाचतांना अनेकदा ठाणेकरांच्या हेवा
आणि बरेचदा असूया हि वाटायची. ठाण्यातील 'वेध'ला
हजेरी लावणे एवढे एकच उत्तर त्या असुयेवर पुरेसे
नव्हते हेही जाणवत होते. आमच्या मनात असलेल्या 'सामाजिक
पालकाला' हा उपक्रम आपल्याही शहरातील मुलांसाठी
व्हायला हवा असे वाटत होते. अकस्मात, वेध आयोजन
प्रशिक्षण घेण्याची संधी समोर आली आणि 'वेध'
नाशिकची मुळं रुजू लागली. गेल्या दोन वर्षात, त्या
मुलांनी तग धरलाय असं म्हणायला हवं ! .....
|
 |
|
|
|
|
Home |
About Vedh |
Vedh Centers |
Faculties |
Vedh In Your City |
Future Vedh |
Testimonials |
DVD
| Media |
Download | |
|
|
 |
This is a
flagship event of IPH running successfully for more
than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH
started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its its 26th edition in December 2018 . IPH with respective partners now organizes
VEDH at Ahmednagar (10yrs), Aurangabad (10yrs) , Nashik (7 yrs), Pune (7 yrs), Latur (7 yrs), kalyan (4 yrs), Pen (3 yrs) and Parbhani (3 yrs)......... |
|
|
+ More |
|
|
 |
9th Floor, Shree Ganesh Darshan,
LBS Marg, Naupada, Thane (west) - 400602,
Maharashtra, INDIA
Tel:
+91 22 2543 3270 / 2536 6577 / 2542 8183
Email : |
 |
|
|
|
|
|
|