Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com
 
     
 

VEDH Centres

 

वेध एक कोलाज

 


एक - दोन नव्हे तर भक्कम पंचवीस वर्षे झाली ह्या गोष्टीला .... ठाणे शहरामध्ये आपल्याला मनआरोग्य विषयावरची संस्था काढायची आहे हया विचाराने झपाटलेले आम्ही सारे असा विचार करत होतो कि, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपल्याला नवीन असे काय करता येईल ! अशा ' टीन एजर्स ' साठी आम्ही एक ' टीन क्लब' नावाचा उपक्रम सुरु केला होता. इंटरनेट पूर्व काळामध्ये मोबाईल असण्याचा प्रश्नच नव्हता. टेलिव्हिजनची झेपसुद्धा मर्यादित होती. त्यामुळ्ये जगाविषयीचे ज्ञान आणि भान देणारी साधने कमीच होती. छापील शब्दांचा अर्थात पुस्तकाचा दबदबा जास्त होता.

आम्ही हया तरुण विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारायचो. दर  रविवारी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पण जवळच्या व्यक्तींना बोलवून त्यांचे अनुभव सांगायला लावायचो. त्यामध्ये कधी शहनाईवादक शैलेश भागवत असायचे. कधी जलतरणपटू आरती प्रधान, कधी त्यावेळचे तरुण पोलीस अधिकारी हेमंत करकरे तर कधी पत्रकार निळू दामले ! ही नावे अशासाठी सांगितली कि आम्हाला एकही व्यवसाय, छंद वर्ज्य नव्हता. इंट्रेस्टिंग माणसाबरोबरच्या गप्पांचा प्रभाव आमच्या क्लब मेंबर्सवर खूपच पडायचा. मुख्य म्हणजे तो टिकायचा.

 
 
 

'वेध'ची जादू

 


एखादया उपक्रमाबरोबर संस्थेचं नाव इतकं घट्ट जोडलं जातं कि तो त्या संस्थेचा 'फ्लॅगशिप प्रोजेक्ट' बनतो. 'वेध व्यवसाय प्रबोधन परिषद' हा आयपीएचचा असाच एक उपक्रम आहे. आयपीएचच्या वीस वर्षाबरोबर या परिषदेने स्वतःची अठरा वर्ष लगातार घोडदौड पूर्ण केली आहे... नेमकी काय आहे हि आयडिया ?

आयपीएच सुरु झालं त्या नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला तणावांकडे पाहण्याचा समाचा दृष्टिकोन पक्का व्हायला सुरुवात व्हायची होती. टेन्शन हाताळणं शक्य वाटावं अशीच जीवनगती होती. एखादा बदल झाला कि तो पचवायला वेळ मिळायचा. आयपीएचच्या ज्या 'आधुनिक' सेवा घेऊन आलं होतं. त्या बालक-किशोर-कुमार-युवा अशा वयोगटांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी होत्या. कुमारवय म्हणजे 'अडोलेसन्स' हि अवस्थाही त्या काळात आजच्याएवढी रेखीव नव्हती.
शरीरशास्त्रीय बदलांच्या दृष्टीने नव्हे, तर मानसिक, सामाजिक व कौटोंबिक आणि नाते संबंधाच्या दृष्टिकोनांतून. त्या वेळची ी तरुणाई प्रौढांपेक्षा वेगळ्या वळणांची होती, पण तिची लिपी भाषा अजून बदलायची होती. तरुणाईचा उंबराही आजच्या एवढा ग्लोबल झाला नव्हता. 'व्यवसायाची निवड' या मुद्दयावरही फार खल व्हायचा नाही......

 
 

       

       
 

Home  |  About Vedh  |  Vedh Centers  |   Faculties  |  Vedh In Your City  |  Future Vedh  |  Testimonials  |  DVD  |  Media Download  |

 

This is a flagship event of IPH running successfully for more than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its its 26th edition in December 2018 . IPH with respective partners now organizes VEDH at Ahmednagar (10yrs), Aurangabad (10yrs) , Nashik (7 yrs), Pune (7 yrs), Latur (7 yrs), kalyan (4 yrs), Pen (3 yrs) and Parbhani (3 yrs).........

 
 

+ More

About Vedh   Vedh Centres  


Vedh Faculties   Vedh In Your City  


Future Vedh   Testimonials  


DVD   Download PDF  

9th Floor, Shree Ganesh Darshan, LBS Marg, Naupada, Thane (west) - 400602,
Maharashtra, INDIA

Tel:
+91 22 2543 3270 / 2536 6577 / 2542 8183
 

Email :

 

  © Copyright 2016 Vedhiph. All Rights Reserved.  

Designed & Develped By Marathe Infotech Pvt. Ltd.