Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com
 
 
 

दि. ९ सप्टेंबर २०१२ रोजी यशवंतराव चव्हाण नाटयगृहात एक अतिशय सुरेख असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम मी माझ्या पूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. या कार्यक्रमातून जे काही ज्ञान मला मिळाले, ते इतर कोणत्याही माध्यमाद्वारे मिळणे अवघड होते. संशोधनक्षेत्रात काम करणाऱ्या वक्तींच्या तोंडून त्यांचे बरे-वाईट अनुभव ऐकण्याची संधी मला माझ्या विद्यार्थीदशेतच मिळाली म्हणून मला खूप आनंद वाटतो आहे.

या सर्व कायर्क्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले. त्यांची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्साह आणि त्यांच्या बोलण्याची शैली फारच आकर्षक, प्रेक्षकांना मोहून टाकणारी अशी आहे. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.

'वेध' परिषदेत एकूण पाच शास्त्रज्ञांनच्या मुलाखती घेण्यात आल्या यात विशेष म्हणजे हे सर्व शास्त्रज्ञ तरुण होते. त्यातील राजदीप चॅटर्जी व रोहन शेट्टी हे तर माझ्या मोठ्या भावाच्या वयाचे होते. त्यांनी लहान वयात एवढे संशोधन केले हे ऐकून मला फारच आश्चर्य वाटले आणि मला ऊर्जा मिळाली. आपणही असे काही करू शकतो, अशी ऊर्जा मिळाली........ 

 

- साक्षी वाणी, ९ वी, पुणे.

 

 
 

'वेध' या कार्यक्रमातून मुलांना शिक्षणासाठी विविध विषयांची माहिती मिळतेच पण मुलांना या व्यक्तीकडून काही चांगले गुणही घेता येतात. या 'वेध' परिषदेत मला या शास्त्रज्ञांकडून खूप काही शिकायला मिळाले. जर आपल्यामध्ये कोणती गोष्ट करायचे असेल, तर ती करण्यासाठी आपल्याला तळमळ, चिकाटी, जिज्ञासा असावी लागते हे आपल्याला तेजस गुप्ते यांच्याकडून शिकायला मिळते, तर १३ वर्षाच्या मायाकडून आपल्याला हे शिकायला मिळते कि, कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्याला वयाची मर्यादा नसते. 

या वर्षाची हि 'वेध' परिषद खूप चांगली होती. या परिषदेमुळे मला संशोधन कसे केले जाते हे समजले. विज्ञान - तंत्रज्ञानासंबंधीची माहिती मिळाली. या 'वेध' च्या कार्यक्रमातून मला वैज्ञानिक ज्ञान प्राप्त झाले. विज्ञानविषयी मला आणखी माहिती मिळाली, त्यामुळे या 'वेध' च्या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे..... 

 

- अर्चना नरहरी तेली, विठ्ठलवाडी, पुणे.

 

 

आपण नेहमीच कार्य करतो. त्या प्रत्येक कार्यास आपण स्वतःला शोधात असतो त्याचप्रमाणे एक बालशास्त्र म्हणजे माया बुऱ्हाणपुरकर हिने कोणाचीही मदत न घेता औषधाची Reaction करून तिने स्वतःला शोधले आहे, असे मला वाटते, मला या कार्यक्रमातून वैज्ञानिक ज्ञान प्राप्त झाले आहे, मला या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं खूप आनंद झाला. या कार्यक्रमाला दरवर्षी येण्याचा प्रयत्न करिन. वैज्ञानिक होण्याची व त्याची पूर्व तयारी करण्याची क्षमता मला कळली. त्यांच्याप्रमाणे आपणही मोठे व्हावे, हि कल्पना जागृत झाली. शिक्षणात येणाऱ्या अडचणींना कसे समोर जावे, याची प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली. 

- प्रियांका रमेश भुवड, इयत्ता : ९ वी, विठ्ठलवाडी, पुणे.

मला कुणीतरी मोठं व्हायचंय. काहीतरी वेगळं करायचं ; पण नक्की काय करायचे ? मोठं व्हायचंय म्हणजे नक्की कसं मोठं व्हायचंय? कुणासारखं ?
हे सर्व प्रश्न मुलांच्या मनामध्ये पडलेले असतात. त्याचं उत्तर म्हेणजे तुमचा हा कार्यक्रम होता. कुमारवयात मुलं आयडॉल शोधत असतात. ते आयडॉल्स समोर उभी करण्याचं काम तुम्ही केलं आहे. 
आपल्या मुलांनी यशस्वी व्हावं हे प्रत्येक पालकांचं स्वप्नं असत ; पण ते मुलांना कसं सामवून सांगावं हे कळत नसते. तुमच्या कार्यक्रमाने पालकांचं काम सोपं करून टाकलं. तुम्ही मुलाखतीसाठी निवडलेल्या व्यक्ती या मोठया वयाच्या नव्हत्या. त्यामुळे मुलांना त्या जवळच्या, स्वतःसारख्यच वाटल्या; आणि हा करु शकतो तर मी का नाही?
हा विचार मुलांच्या मनात येऊ शकला. यातच कार्यक्रमाचे यश आहे. 

 

- सौ. उर्मिला संतोष चोरपडे, पुणे.

 

BACK PAGE  |

NEXT PAGE  |

 


 


       

       
 

Home  |  About Vedh  |  Vedh Centers  |   Faculties  |  Vedh In Your City  |  Future Vedh  |  Testimonials  |  DVD  |  Media Download  |

 

This is a flagship event of IPH running successfully for more than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its 23rd edition in December 2014. IPH with respective partners now organizes VEDH at Ahmednagar (8yrs.), Pune (3 yrs), Latur (3 yrs), Aurangabad (7yrs) and Nashik (3 yrs), Nagpur (2 yrs)........

 
 

+ More

About Vedh   Vedh Centres  


Vedh Faculties   Vedh In Your City  


Future Vedh   Testimonials  


DVD   Download PDF  

9th Floor, Shree Ganesh Darshan, LBS Marg, Naupada, Thane (west) - 400602,
Maharashtra, INDIA

Tel:
+91 22 2543 3270 / 2536 6577 / 2542 8183
 

Email :

  © Copyright 2016 Vedhiph. All Rights Reserved.  

Designed & Develped By Marathe Infotech Pvt. Ltd.