Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com
 
 
 

 

 

माझे हे पहिलेच वर्ष आहे. 'वेध' चे त्यामुळे पहिल्यांदा वाटलं कि जाऊ कि नको ; पण मला तिकीट मिळाले व ते माझे भाग्यच कारण येथे भरपूर काही शिकण्यासारखे मिळाले. व future बाबतही भरपूर काही मिळाले व हे सर्व मिळाले ते मान्यवर डॉ. रूपा रेगे, प्रसाद पुरंदरे, अॅड. असीम सरोदे व तसेच आनंद नाडकर्णी व हे वेध खूप छान झाले. या सत्रापर्यंत खूप काही लिहिण्यासारखे आहे; पण कागद अपुरा पडतो व मी दरवर्षी हे 'वेध' चे शिबीर मी join करेन व पुढच्या वेळेस माझ्या पालकांनाही घेऊन येईल.

     - कुणाल देशमुख ( लातूर )

 

'वेध' ह्या कार्यक्रमा अंतर्गत तीन व्यक्तींचा परिचय झाला आहे. असामान्य व्यक्तींचे सामान्य छंद, आवडी यांचाही परिचय झाला आहे. या कार्यक्रमामुळे आपण आवडीच्या क्षेत्रात समाजासाठी काही करू शकतो, याची जाणीव झाली आहे. अनुभवातून संशोधन केले, तरच ते अर्थपूर्ण आहे. हा रूपा रेगे ह्यांचा विचार आम्हाला संशोधक व्हायचे असल्याने खरेच पटलेला आहे. कठीण गोष्टी सोप्या करून इतरांना समजावणारी व्यक्ती great असते, हा अॅड. सरोदे ह्यांचा विचार खरेच खूप आवडला. दरवर्षी असा कार्यक्रम करून आम्हाला चांगले विचार द्यावे तसेच अनेक आभार.

- शरयु तावरे ( श्री देशीकेंद्र विद्यालय, लातूर )

''वेध' हा कार्यक्रम अत्यंत छान आहे. आम्हाला जी माहिती मिळाली, ती फार महत्वाची आणि आम्हाला अत्यंत उपयोगी आहे. Thank you for your idea...  या कार्यक्रमामुळे आम्हाला खरा Great कोण असतो ते समजले.

 - शुभांगी जाधव

 

या संवादामुळे आपल्याला जो व्यवसाय निवडायचा असतो, त्या व्यवसायाबद्धलच्या शंका व त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हे कळले तसेच आपल्या कर्तृत्वाचे मोजमाप कसे करायचे हे कळाले . मी आनंद नाडकर्णी यांची आभारी आहे. मला खात्री आहे कि, या प्रोग्राममुळे  माझ्या आयुष्यात नक्कीच प्रभाव पडेल.

 - ईश्वरी मल्लिकार्जून पेद्दे ( श्री. देशिकेंद्र विद्यालय, लातूर )

परवा, तिकीट मिळाल्यापासून मी कार्यक्रम पहाण्यासाठी आतुर होतो. मला आतापर्येंत आलेल्या सर्व मान्यवरांचे विचार आवडले व ते पटलेही. आपल्या कर्तृत्वाच्या  मोजमापनाचे सूत्र मला उमगले. या सर्व मान्यवरांचे अनुभव व कार्य ऐकून मी माझ्या परीने यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करिन आणि मी सुद्धा माझ्या कर्तृत्वाचे मोजमापं करेन या सर्वांसाठी मी 'वेध' चा आभारी आहे. मला आणखीही काही लिहायचे आहे. परंतु मी लिहीन या सर्वांच्या कार्यक्रमावरून  काही महत्वाचे विचार व त्यांचा सामान्यपणा समजून येतो. डॉ. नाडकर्णी यांच्या "Edutainment" या विचारांशी मी सहमत आहे
 

     - मुकुल माणिक जोशी

 

 


'जगण्याचा ताल आणि तोल' हे वेध व्यवसाय परिषदेचे सूत्र समजल्यापासून मनात विचार मंथन सुरु झाले. आजच्या युगात किती समर्पक आणि सूचक आहेत हे सूत्र.
प्रत्येकजण जीवनातल्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत करत असतो. हि कसरत म्हणजे 'ताल 'आणि 'तोल ' यांचा समन्वय साधत केलेला जीवनप्रवासच असतो. खास करून स्त्रियांची तर हा तोल सांभाळताना पूर्ती दमछाक होते. कारण त्यांना फक्त कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पडायच्या नसतात, तर सगळ्यांना बरोबर घेऊन कुटुंबाचा तोल राखायचा असतो. आपल्या कुटुंबाचं जहाज या जीवन सागरात हेलपाटू द्यायचं नसतं. जगण्याचा ताल आणि तोल सांभाळत हा जीवनप्रवास करायचा असतो.
शुक्रवार आणि शनिवार या व्यवसाय परिषदेत जे मान्यवर आले. त्यांचे विचार, 'जगण्याचा ताल आणि तोल' या सूत्राभोवती त्यांनी धरलेला फेर आणि त्याचे माझ्या मनात उठलेले तरंग याचा आढावा घेण्याचा माझ्या परीने मी केलेला प्रयत्न.
 

     - - सौ रूप मिहीर नाशिककर, ठाणे

 
 

BACK PAGE  |

NEXT PAGE  |


 


       

       
 

Home  |  About Vedh  |  Vedh Centers  |   Faculties  |  Vedh In Your City  |  Future Vedh  |  Testimonials  |  DVD  |  Media Download  |

 

This is a flagship event of IPH running successfully for more than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its its 26th edition in December 2018 . IPH with respective partners now organizes VEDH at Ahmednagar (10yrs), Aurangabad (10yrs) , Nashik (7 yrs), Pune (7 yrs), Latur (7 yrs), kalyan (4 yrs), Pen (3 yrs) and Parbhani (3 yrs).........

 
 

+ More

About Vedh   Vedh Centres  


Vedh Faculties   Vedh In Your City  


Future Vedh   Testimonials  


DVD   Download PDF  

9th Floor, Shree Ganesh Darshan, LBS Marg, Naupada, Thane (west) - 400602,
Maharashtra, INDIA

Tel:
+91 22 2543 3270 / 2536 6577 / 2542 8183
 

Email :

  © Copyright 2016 Vedhiph. All Rights Reserved.  

Designed & Develped By Marathe Infotech Pvt. Ltd.