Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com
 
     
 

नगर - वेध

विदयार्थी सर्वांगीण विकासासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटी सदैव कटिबद्ध आहे. या संस्थेतील विदयार्थी व पालकांसाठी आम्ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. राबवत असलेल्या उपक्रमांचा लाभ समाजातील इतर विदयार्थी व पालकांनाही हवा, या हेतूने गेल्या ८ वर्षांपासून विदयार्थी व पालकांसाठी श्री. फिरोदिया ट्रस्ट पुरस्कृत स्व. नवलमलजी फिरोदिया स्मरणार्थ 'वेध' व्यवसाय प्रबोधन परिषद केली जाते.

अहमदनगर शहराचे सुपुत्र प्रसिद्ध सिनेअभिनेते व प्रशालेचे माजी विदयार्थी सदाशिव अमरापूरकर व सुनंदा अमरापूरकर यांनी मांडलेल्या 'वेध' कल्पनेला अहमदनगर एज्युकेशन सोसायटीने मूर्त रूप दिले. गेल्या ८ वर्षांपासून 'वेध' कार्यशाळेची लोकप्रियता इतकी वाढली कि, जिल्ह्यातील, शहरातील, शाळा, पालक व इतरही क्षेत्रांतून या वर्षीचा कार्यक्रम कधी होणार अशी विचारणा सदैव केलीजात असते.

पालक व समाजाचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बहुतांशी बुद्धिगुणांवर अवलंबून आहे. त्या प्रकारची वागणूक विद्यार्थ्यांना कुटुंबातून व समाजातून मिळते. त्यामुले विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. सर्व विद्यार्थ्यांचा बुद्धयांक एकसारखा असू शकत नाही हे नैसर्गिक सत्य आहे. शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतरही अनेक गन विद्यार्थ्यांनमध्ये असतात ते ओळखून त्यांची जोपासना, कदर, करण्याची खरी गरज आहे.

जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर आपली सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक परीस्थिती चांगलीच हवी असा समाज समाजामध्ये रूढ झाला आहे: परंतु खडतर कष्टदायी जीवनात परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्यांची संख्याही समाजात कमी नाही, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासासह इतरही अनेक क्षेत्रे आहेत, याची जाणीव विदयार्थी व पालकांना होणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांचा विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व विद्यार्थ्याने स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या हेतूने जीवनात यशाचे शिखर गाठणाऱ्या विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्वांनी जर आपले प्रत्यक्ष अनुभव पालक व विद्यार्थ्यांसमोर कथन केले, तर त्यातून प्रेरणा घेऊन पालक व विदयार्थी यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो हाच उद्देश मुळाशी धरून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत.....


       

       
 

Home  |  About Vedh  |  Vedh Centers  |   Faculties  |  Vedh In Your City  |  Future Vedh  |  Testimonials  |  DVD  |  Media Download  |

 

This is a flagship event of IPH running successfully for more than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its its 26th edition in December 2018 . IPH with respective partners now organizes VEDH at Ahmednagar (10yrs), Aurangabad (10yrs) , Nashik (7 yrs), Pune (7 yrs), Latur (7 yrs), kalyan (4 yrs), Pen (3 yrs) and Parbhani (3 yrs).........

 
 

+ More

About Vedh   Vedh Centres  


Vedh Faculties   Vedh In Your City  


Future Vedh   Testimonials  


DVD   Download PDF  

9th Floor, Shree Ganesh Darshan, LBS Marg, Naupada, Thane (west) - 400602,
Maharashtra, INDIA

Tel:
+91 22 2543 3270 / 2536 6577 / 2542 8183
 

Email :

  © Copyright 2016 Vedhiph. All Rights Reserved.  

Designed & Develped By Marathe Infotech Pvt. Ltd.